breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मनसे आंदोलन; थिएटर मालकांना दिलासा देण्यास उच्च न्यायलयाचा नकार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभरातील मल्टिप्लेक्स थिएटरविरोधात सुरु केलेल्या आंदोलनासंदर्भात थिएटर मालकांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. मारहाणीविरोधात तुमच्याकडे पोलिसांत तक्रार करण्याचा पर्याय आहे. त्याचा या जनहित याचिकेशी संबंध नाही असे उच्च न्यायलयाने स्पष्ट केले आहे.

पुण्यातील एका मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये खाद्यपदार्थ अवाजवी दरात विकल्याबद्दल, तिथल्या कर्मचाऱ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीविरोधात, मल्टिप्लेक्स मालक संघटनेने सोमवारी उच्च न्यायलयात धाव घेतली होती. मात्र दिलेल्या आदेशात कोणताही बदल करण्यास उच्च न्यायलयाने स्पष्ट नकार दिला.

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अशाप्रकारे धमकी देणे आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणे चुकीचे असल्याचे संघटनेचे म्हणणे होते. त्यामुळे जोपर्यंत उच्च न्यायलय यासंदर्भात अंतिम आदेश देत नाही तोपर्यंत या हिंसक घटना बंद करव्यात असे निर्देश हायकोर्टाने जारी करावेत अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. उच्च न्यायलयाने दिलेले आदेश स्पष्ट आहेत, त्यात कोणताही बदल करण्याची आवश्यकता वाटत नसल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button