breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मनपा शाळेतील कार्यरत आणि सेवानिवृत्त शिक्षकांना ‘धन्वंतरी’चा लाभ मिळणार

  • आमदार महेश लांडगे  व लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्याला यश
  • शिक्षण समिती सभापती सोनाली गव्‍हाणे यांची माहिती

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिक्षकांना अखेर धन्वंतरी योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंजूर केला आहे. गेल्या २५ वर्षांपासून शिक्षकांची ही मागणी मंजुरीच्या प्रतीक्षेत होती. विशेष म्हणजे, सेवानिवृत्त शिक्षकांनाही या विमा योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात १४ ऑक्टोबर २०१८ रोजी शिक्षक मेळावा घेतला. त्यावेळी शहरातील शासकीय आणि निमशासकीय तसेच खासगी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. यावेळी संघटनांच्या प्रतिनिधींनी आमदार महेश लांडगे यांना ‘धन्वंतरी’ योजना लागू करण्याबाबत सांकडे घातले होते. महापालिका प्रशासनाकडे प्रलंबित असलेला हा विषय लवकरात लवकर मार्गी लावला जाईल, असे आश्वासन आमदार लांडगे यांनी शिक्षकांना दिले होते. दरम्यान, आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्‍हाणे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. महापालिकेच्या शाळांमधील सेवेतील, तसेच सेवानिवृत्त शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वैद्यकीय उपचारांसाठी धन्वंतरी स्वास्थ्य योजना लागू करण्याची शिफारस प्रशासनाकडे करण्यात आली.

महापालिका प्रशासनाच्या वतीने सर्व कर्मचा-यांना धन्वंतरी योजना लागू केली होती. मात्र, शिक्षकांना या योजनेतून वगळण्यात आले होते. सुमारे ११०० शिक्षक आणि सुमारे 800 सेवानिवृत्त शिक्षकांना या योजनेचा लाभ मिळणाक आगेय त्यामुळे शिक्षकांना आरोग्य वीमा योजनेचे सर्व फायदे मिळणार आहेत, अशी माहिती पदविधर प्राथमिक शिक्षक संघटनेचे सचिव हरिष चौधरी यांनी दिली.

शहर आणि परिसरातील तब्बल ९८ रुग्णालयांचा समावेश धन्वंतरी स्वास्थ योजनेमध्ये आहे. महापालिका प्रशासनातील सर्व कर्मचा-यांना या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, शिक्षकांना त्यातून वगळण्यात आले होते. आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आम्ही त्याबाबत प्रशासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला.

सोनाली गव्हाणे, सभापती- शिक्षण समिती

शिक्षकांना धन्वंतरी योजनेचा लाभ सर्व शिक्षकांना मिळावा, अशी मागणी आम्ही भोसरीतील शिक्षक मेळाव्यात केली होती. त्यावेळी आमदार महेश लांडगे यांनी आम्हाला आश्वासन दिले होते. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याबाबत शिक्षण समिती सभापती सोनाली गव्‍हाणे यांनी पुढाकार घेतला. तसेच आमदार लक्ष्मण जगताप यांनी शिक्षकांच्या मागण्या समजून घेतल्या. शहरातील सर्व शिक्षकांच्या दृष्टीने हा अत्यंत दिलासादायक निर्णय झाला आहे.

मनोज मराठे, अध्यक्ष- पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटना

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button