breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मनपा कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करु -आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी (महा ई न्यूज) – महापालिकेत 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचा-यांना अंशदान पेन्शन देण्यात येते. त्या कर्मचा-यांची आर्थिक सुरक्षितता धोक्यात येवून नविन व जुन्या कर्मचा-यांची आर्थिक नुकसान झाले आहे. नविन परिभाषीत अंशदान निवृत्ती वेतन योजना रद्द करुन महापालिकेमध्ये लागु असलेली जुनी पेन्शन योजना पुर्ववत सुरु करण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिले. 
पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने रविवारी (दि.13) थेरगाव कैलास मंगल कार्यालयात कर्मचा-यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे, महासचिव चारुशिला जोशी, नितीन समगीर, मनोज माछरे, आबा गोरे उपस्थित होते.
महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे म्हणाले की, नोव्हेंबर 2005 नंतर मनपा सेवेत रुजु झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांना महाराष्ट्र शासन वित्त विभागाकडील दिनांक 31 ऑक्टोबर 2005 च्या शासन निर्णयानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नविन परिभाषीत अंशदान निवृत्ती वेतन योजना मनपा अधिकारी, कर्मचारी यांना लागु करण्यात आली आहे. तथापि या संदर्भात सदर योजना स्थानिक स्वराज्य संस्थांना लागु करण्याबाबत संधिग्धता असल्यामुळे व मनपा सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना सदर योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ मिळालेले नाहीत. दिनांक 9 जानेवारी 2019 रोजी नविन परिभाषीत अंशदान निवृत्ती वेतन योजना लागु असलेल्या कर्मचाऱ्यांनी सदरची योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करणेकामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाकडे अर्ज केल्याने या योजनेतील तरतुदींचा अभ्यास करुन उपरोक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता.
राज्यातील काही महानगरपालिकांनी माहिती अधिकारांतर्गत अंशदान पेन्शन योजनेबाबत शासनाकडे माहिती मागविली असता सदर योजना ही स्थानिक स्वराज्य संस्थाना लागु नसलेबाबत शासनाने कळविले आहे. वास्तविक पाहाता मनपातील कर्मचाऱ्यांना अंशदान पेन्शन योजना लागु करणे संबंधी मनपाच्या सर्वसाधारण सभेमध्ये कोणत्याही प्रकारची मंजुरी न घेता सदरची योजना मनपा कर्मचाऱ्यांना एकतर्फी लागु केल्याने सदर कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षीतता धोक्यात येवुन कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. कार्यक्रमा  सुत्रसंचालन हनुमंत लांडगे व आभार मनोज माछरे यांनी मानले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button