breaking-newsराष्ट्रिय

मथुरा लोकसभेसाठी हेमा मालिनी आणि सपना चौधरी यांच्यात लढत

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या सुपरहिट दंगलसाठी व्यासपीठ तयार होत आहे. हरियाणवी डान्सर सपना चौधरी मथुरा लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी सपना काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मथुरा मतदार संघातून आधीच भाजपने अभिनेत्री हेमा मालिनी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सपनाला काँग्रेसकडून तिकीट मिळाल्यास हेमा यांच्यासोबतची मथुरेतील लढत उत्सुकता वाढविणारी ठरणार आहे.

भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार हेमा मालिनी यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. मथुरा मतदार संघात जाट समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. या समुदायाची भूमिका कोणत्याही पक्षासाठी निर्णायक राहणार आहे. काँग्रेसकडून सपना चौधरीला तिकीट मिळाल्यास जाट मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसला मदत होईल. या व्यतिरिक्त पश्चिम उत्तर प्रदेशात सपना चौधरीचे फॅन फॉलोवर्स मोठ्या प्रमाणात आहेत.

सपनाला काँग्रेसचे तिकीट मिळाल्यास हेमा मालिना यांना मथुरेत तगडे आव्हान मिळणार आहे. त्याचे कारण म्हणजे सपा-बसपा युतीकडून कुंवर नागेंद्र सिंह मैदानात आहेत. ते देखील जाट नेते आहे. २०१४ मध्ये जाट मते एकगठ्ठा भाजपला मिळाले होते. परंतु ही मते विभागल्यास त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदार संघात जाट आणि मुस्लीम मतदारांचे वर्चस्व आहे. २०१४ मध्ये जाट आणि मुस्लीम मतदार वेगळे झाल्यामुळे युपीएलला फटका बसला होता. ही विभागणी रोखण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. २०१४ च्या आकडेवारीनुसार मुथरा लोकसभा मतदार संघात १७ लाख मतदार आहेत. यामध्ये ९.३ लाख पुरुष असून सात लाख महिला मतदार आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button