breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मणिपूरमध्ये “आयईडी’च्या स्फोटात दोन जवान शहिद

इंफाळ (मणिपूर) – मणिपूरच्या पूर्व भागामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या तळाजवळ झालेल्या “आयईडी’च्या स्फोटामध्ये बीएसएफचे दोन जवान शहिद झाले. दिमापूर इंफाळ महामार्गावर कोइरेंगेइ येथील बीएसएफच्या मुख्यालयाबाहेर दुपारी 2 वाजता हा स्फोट घडवून आणण्यात आला. तळाबाहेर सुरक्षेसाठी उभे असलेले दोन जवान या स्फोटामध्ये मारले गेले, असे “बीएसएफ’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

या स्फोटामध्ये तीन अन्य नागरिक जखमी झाले आहेत. या सर्वांना रिजनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जखमी नागरिकांवर उपचार सुरू आहेत. मणिपूरमध्ये सक्रिय असलेल्या घुसखोरांनी “बीएसएफ’च्या तळाबाहेर “आयईडी’ पेरून ठेवले असल्याचा संशय आहे. या स्फोटाची कोणत्याही गटाने जबाबदारी स्वीकारलेली नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button