breaking-newsराष्ट्रिय

…मग देवच तुम्हाला वाचवू शकेल; सुप्रीम कोर्टाने कार्ती चिदंबरम यांना सुनावले

एअरसेल- मॅक्सिस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सुप्रीम कोर्टाने बुधवारी कार्ती चिदंबरम यांना खडे बोल सुनावले आहेत. कार्ती चिदंबरम यांना चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) हजर होण्याचे आदेश देतानाच चौकशीत सहकार्य केले नाही तर मग तुमचे रक्षण देवच करु शकेल. आम्ही तुमच्याविरोधात अत्यंत कठोर भूमिका घेऊ, अशी तंबीच सुप्रीम कोर्टाने दिली आहे.

कार्ती चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडिया या टेलिव्हिजन कंपनीत ३०० कोटी रुपयांच्या परकीय गुंतवणूकीसाठी सरकारी परवानग्या मिळवून दिल्याचा आरोप आहे. कार्ती यांनी या परवानग्या मिळवून देण्यासाठी वडिलांच्या पदाचा फायदा घेतला असा तपासकर्त्या अधिकाऱ्यांचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीकडून तपास सुरु आहे. परदेशवारीस परवानगी मिळावी यासाठी कार्ती चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सोमवारी सुप्रीम कोर्टाने ईडीला आदेश दिले होते. कार्ती चिदंबरम याची कधी चौकशी करावयाची आहे त्याची तारीख ३० जानेवारीपर्यंत स्पष्ट करावी, असे आदेशात म्हटले होते.

बुधवारी सुप्रीम कोर्टात या प्रकरणात सुनावणी झाली. ५, ६, ७ आणि १२ मार्च रोजी कार्ती चिदंबरम यांची चौकशी केली जाईल, असे ईडीने कोर्टात सांगितले. सुप्रीम कोर्टाने या तारखेला ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश कार्ती चिदंबरम यांना दिले. ‘तुम्ही तपास यंत्रणांना चौकशीत सहकार्य करत नाही. आम्ही तुर्तास अधिक भाष्य करणार नाही. मात्र, जर तुम्ही चौकशीत सहकार्य केले नाही, तर मग तुम्हाला फक्त देवच वाचवू शकेल. आम्ही तुमच्याविरोधात कठोर भूमिका घेऊ, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने हे मत मांडले.

सुप्रीम कोर्टाने कार्ती चिदंबरम यांच्या परदेशवारीला परवानगीही दिली. यू के आणि फ्रान्स येथे आमच्या कंपनीतर्फे टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे चिदंबरम यांच्या वकिलांनी सांगितले होते. यावर सुप्रीम कोर्टाने कार्ती यांना परदेशात जाण्याची परवानगी दिली. मात्र, परदेशातून परत येण्याची हमी म्हणून सुप्रीम कोर्टात १० कोटी रुपये जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button