breaking-newsराष्ट्रिय

मगरीच्या हल्ल्यातून काकाला वाचविणाऱ्या चिमुकल्याला पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार

मगरीने जखडून ठेवलेल्या काकाचे प्राण वाचविणाऱ्या १५ वर्षीय सीतू मलिकच्या दुर्मिळ साहसाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव होणार आहे. ओडिशामधील केंद्रपाडा जिल्ह्यातील कंदिरा गावात राहणाऱ्या सीतू मलिकला त्यांच्या धाडसाबद्दल यंदा राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. २३ जानेवारी २०१९ रोजी त्याला पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

२० फेबु्रवारी रोजी सीतू आणि त्याचे काका विनोद मलिक हंसिना नदीच्या काठावर असलेल्या शेतात गेले होते. यावेळी तलावातून आलेल्या मगरीने त्याचे काका विनोद मलिक यांना हातांनी गच्च पकडून ठेवले होते. काका विनोद मरणाच्या दारात असतानाच सीतूने प्रसंगावधान दाखविले. घाबरून न जाता सीतूने काडीने मगरीच्या डोक्यात फटका मारला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घाबरलेल्या मगरीने विनोद मलिक यांना सोडून देत तलाव पळ काढला. त्यांच्या या साहसाची भारतीय बाल कल्याण परिषदेने दखल घेतली होती. त्यानंतर त्याला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार करण्यात आला आहे.

संपूर्ण जिल्ह्याला सीतूचा अभिमान
जिल्ह्यातील मुलाची राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड झाल्याचे कळल्यानंतर अभिमानास्पद वाटत आहे. भारतीय बाल कल्याण परिषदेने ही निवड केली असून, पुरस्कारासाठी निवड झाल्याचे आयसीसीडब्ल्यूचे पत्र जिल्हा प्रशासनाला मिळाले आहे, असे उर्त्स्फूत प्रतिक्रिया केंद्रपाडाचे जिल्हाधिकारी दशरथी सत्पथी यांनी दिली. याचबरोबर आमच्या शाळेतील विद्यार्थ्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते सीतूला हा पुरस्कार मिळणार असून, आम्हाला अभिमानाने आमचा ऊर भरून आला आहे, असे सीतूच्या शाळेचे मुख्याध्यापक महेश्वर राऊत यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button