breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मंत्री पदासाठी जगतापांचे भाजपवर दबावतंत्र?, संजोग वाघेरे यांचा आरोप

पिंपरी, (महा ई न्यूज) – भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप हे आगामी लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार असल्याचा अंदाज एका एजन्सीने वर्तविल्यानंतर त्याचा सोशल माध्यमातून प्रचार झाला. त्याला आमदार जगताप यांनी आपण भाजपशिवाय अन्य पक्षात जाणारच नसल्याचे सांगून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी त्यांच्या या भूमिकेवर जोरदार टिका केली आहे. मंत्री पद पदरात पाडून घेण्यासाठी त्यांच्याकडून पक्षावर दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचे वाघेरे यांनी म्हटले आहे.

वाघेरे म्हणाले की, राजकारण सोडेन,पण शेकाप सोडणार नाही, अशी आरोळी गत लोकसभेला (2014) केलेले आमदार जगताप हे भाजपला अद्याप कळलेले नाहीत. जगतापांना पक्षाने सगळं देऊनही त्यांनी आता पक्षाला त्रास देण्यास सुरूवात केली आहे. मंत्री पद मिळविण्यासाठी त्यांचेच हे दबावतंत्राची खेळी असण्याची शक्यता आहे. असे त्यांच्याबरोबरच्या वीस वर्षाच्या अनुभवातून वाटते. त्यांना पक्षात घ्यायचे असते, असेही वाघेरे म्हणाले.

राष्ट्रवादीत असताना दादांनी त्यांना महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती पदांसारखी मोठी पदे कोणाला द्यायची, याचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. तरीही, त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन भाजपत प्रवेश केला. तत्पुर्वी, शेकापसोबतही हीच खेळी त्यांनी खेळली. गेल्या लोकसभेला पराभूत झाल्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला. आता दबाव वाढवून त्यांना मंत्री पद पदरात पाडून घेण्याची त्यांची खेळी असेल, असेही वाघेरे यांनी सांगितले.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button