breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक; ड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदेशीर चित्रीकरण

पिंपरी – यावर्षी पिंपरी पोलीस ठाण्यातून एकाही गणेश मंडळाला ड्रोनद्वारे फोटो सेशन अथवा व्हिडीओ रेकॉर्डींग करण्याची परवानगी दिली नाही. तरीही, ड्रोनद्वारे चित्रीकरण करत संत तुकारामनगरमध्ये एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. पोलीस समोर असुनही कायदा पायदळी तुडविणा-या या गणेश भक्तांवर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसच अशा गुन्हेगारी कृत्यांना आधार देतात की काय? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

संत तुकारामनगर मधील समता तरुण मित्र मंडळाच्या गणपतीची मिरवणूक आज रविवारी (दि. 23) दुपारी दोनच्या सुमारास काढण्यात आली. संत तुकारामनगर पोलीस चौकीच्या समोरून अग्निशामक केंद्राच्या समोरील चौकात मिरवणूक आली. ढोल-ताशा पथकाचा गगणभेदी आवाज घूमत होता. भल्या मोठ्या रथात गणरायांची मुर्ती विराजमान झाली होती. कार्यकर्त्यांमध्ये असह्य उत्साह संचारलेला होता. मिरवणुकीसाठी पुढे वल्लभनगरकडे जाणारी वाहतूक काही वेळेसाठी रोखली होती.

दरम्यान, मंडळातर्फे ड्रोनद्वारे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डींग केले जात होते. मिरवणुकीचे संपूर्ण चित्रीकरण झाल्यानंतर ड्रोन ऑपरेट करणारे तिघेजण त्यांचे ठरलेले शूल्क घेऊन निघून गेले. याबाबत पोलिसांकडे चौकशी केली असता यावर्षी शहरात ड्रोनद्वारे फोटो अथवा व्हिडीओ रेकॉर्डींग करण्यासाठी एकाही व्यक्तीला परवानगी दिली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होत असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यासाठी परवानगी दिली जाते. मात्र, यावर्षी गणेश मंडळांना अशी एकही परवानगी दिली गेली नाही. जर, कोणी असा प्रकार करत असेल. तर, तो बेकायदेशीर आहे. त्याची दखल घेतली जाईल.

विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस ठाणे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button