breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरी रुग्णालय खासगीकरण; त्या युवकाच्या तक्रारीची थेट पंतप्रधान कार्यालयाकडून दखल

  • योग्य ती कार्यवाही करावी, आयुक्तांना सूचना 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने भोसरी रुग्णालय खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला. या भोसरी रुग्णालय खासगीकरणाला विरोध करणा-या एका युवकाच्या तक्रारीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने दखल घेतली आहे. यासंर्दभात मुख्यमंत्री कार्यालयास पत्र पाठवण्यात आले आहे. 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने गोरगरीब जनतेसाठी बांधलेले शंभर बेडचे भोसरी रुग्णालय खासगीकरण करण्याचा निर्णय भाजपने घेतला. त्या निर्णयाला शहरातील नागरिकांसह सुमारे 35 हून अधिक सामाजिक संघटनेसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी कडाडून विरोध केला.

त्यावर आधार सोशल फाउंडेशनचे विकास भुंबे यांनी थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयास पत्र पाठवून भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण रद्द करण्याची मागणी केली. यावर योग्य ती कार्यवाही करावी, असे सुचित करण्यात आले आहे. आता मुख्यमंत्री कार्यालय काय दखल घेणार ?? याकडे लक्ष लागले असून यापूर्वीही मुख्यंमत्री कार्यालयात देखील निवेदन दिले होते
दरम्यान, भोसरी रुग्णालय खासगीकरण रद्द होणार नाही, तोपर्यंत हा लढा चालूच राहील, तसेच भोसरी हॉस्पिटल खाजगीकरणावर आयुक्तांनी लेखी आश्वासन दिले कि, तीन महिन्यांनी सभागृहात तो खाजगीकरणाचा प्रस्ताव पुन्हा आणु आणि नगरसेवकासमोर मांडण्यात येईल, त्यावर नगरसेवक विरोध करतील, अशी अपेक्षा करू नाहीतर तो कायदेशीर रद्द करण्याबाबत प्रयत्न चालुच आहे, असे विकास भुंबे यांनी सांगितले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button