breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत शिवसृष्टीची दुरवस्था

भोसरी –  महापालिकेच्या वतीने भोसरी लांडेवाडी येथे उभारण्यात आलेली शिवसृष्टीची दुरवस्था झाली आहे. परिसरातील शिल्पावर अनेक ठिकाणी गवत उगवले आहे. जागोजागी अस्वच्छता, पथदिवे बंद अशा अनेक समस्यांनाचा सामना शिवसृष्टी करीत आहे. पालिका प्रशासनच्या  उदासीनतेमूळे शिवसृष्टीची व शिल्पाची दुरवस्था झाली आहे.  शिवसृष्टीची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी शिवप्रेमी व परिसरातील नागरिक करीत आहेत.

लांडेवाडी, भोसरी  येथे पालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्‍वरूढ पुतळा व शिवसृष्टी नागरिकांसाठी उभारण्यात आली आहे. शिवसृष्टीत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनातील, बाळ शिवाजी जन्म सोहळ्या पासून ते राज्याभिषेकापर्यंतचे पंचवीस महत्वाचे प्रसंग आकर्षकरित्या शिल्पामध्ये उभारण्यात आले आहे . शहारातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक शाळा हे शिल्प पाहण्यासाठी येत असतात. परंतू शिवसृष्टीला अनेक समस्यांनी घेरले आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे.

शिवसृष्टीतील छतावर गवतांचे झुडपे वाढलेली आहेत. झाड्यांचा फांद्यांमुळे अनेक शिल्प झाकले गेले असल्याचे शिवप्रेमी सांगतात.  शिल्पासमोरील अनेक पथदिवे बंद स्थितीत आहेत.  त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी शिवसृष्टी पाहताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या शिवसृष्टीच्या बाजूला बिनधास्तपणे वाहाने लावली जात आहेत. तसेच अनेक दिवस शिवसृष्टी न धुतल्याने सर्व शिल्पावर धूळ साचलेली आहे. शिवसृष्टीची झालेली दुरवस्थेबाबत पालिकेने ठोस उपयोजना करावेत अशी मागणी शिवप्रेमी व परिसरातील नागरिक करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button