breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत दादागिरी वाढली ; वाहने तोडफोडीचे सत्र कायम

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात प्रचंड दहशत निर्माण होत आहे. किरकोळ कारणावरुन वाहन तोडफोडीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यानूसार सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भोसरीमधील गव्हाणे वस्ती परिसरात 16 जणांच्या टोळक्याने 18 वाहनांची तोडफोड केली. तोडफोड करण्यात आलेल्या वाहनांमध्ये 16 कारचा समावेश आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

अमोल हनुमंत कदम (वय 33, रा. जैन शांतिनिवास जवळ, आदिनाथनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम यांनी रामनगर हाऊसिंग सोसायटी जवळ सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला त्यांची कार रोजच्याप्रमाणे पार्क केली. कार लावून घराच्या दिशेने जात असताना अचानक 5-6 दुचाकींवरून 16 जण आले. त्यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडके आणि लोखंडी कोयत्याच्या साहाय्याने कदम यांच्या कारची तोडफोड केली. तसेच परिसरातील अन्य 17 वाहनांची तोडफोड केली. तोडफोड करण्यात आलेल्या वाहनामध्ये स्कोडा, सफारी, ब्रिझा, होंडा सिटी, मारुती स्विफ्ट यांसारख्या महागड्या गाड्यांचा समावेश होता. परिसरात आरडाओरडा करून सर्वजण प्रभू रामचंद्र सभागृहाच्या दिशेने निघून गेले. त्यानंतर कदम यांनी पोलिसांना फोन करून घडलेल्या प्रकारची माहिती दिली. माहिती मिळताच भोसरी पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पहाटे तीनच्या सुमारास या प्रकारातील 5 जणांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब बुचडे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button