breaking-newsपिंपरी / चिंचवड

भोसरीत किरकोळ कारणावरुन तरुणाला लाकडी दांडक्याने जबर मारहाण

पिंपरी चिंचवड :- किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून दोघा जणांनी मिळून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि.१८) सकाळी अकराच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथील महात्मा फुलेनगरमध्ये घडली.

याप्रकरणी जखमी तरुण गौतम अशोक राक्षे (वय २३, रा. महात्मा फुलेनगर, भोसरी) याने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मनोज शहा (वय २४) आणि कमल शहा (वय ४५) या दोघा मायलेका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथील महात्मा फुलेनगरमधील माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांच्या कार्यालयासमोर फिर्यादी गौतम उभे होते. यावेळी आरोपी मायलेक मनोज आणि कमल हे दोघेही तेथे आले. आणि किरकोळ कारणावरुन त्यांनी गौतमसोबत वाद घालत. तसेच गौतम याला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.  भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button