breaking-newsआंतरराष्टीय

भीषण मेजुनू वादळामुळे ओमानमध्ये मोठी वित्तहानी

सलालाह (ओमान) – मेकुनू चक्रिवादळामुळे दक्षिण ओमान आणि शेजारील येमेनमध्ये आतापर्यंतच्या सर्वात मोठी वित्तहानी केली आहे. या देशांमधील शहरांमध्ये गेल्या तीन वर्षातील पवसाची नोंद कालच्या एका दिवसात झाली आहे. या वादळामुळे आतापर्यंत किमान 6 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 30 पेक्षा अधिक जण बेपत्ता झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मेकुनू चक्रिवादळामुळे ओमानमधील तिसऱ्या क्रमांकाचे शहर सलालाहमधील रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे सखल भागात पूरसदृश्‍य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील वाहतुक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्यांवरील दिव्यांचे खांब कोसळले आहे आणि अनेक घरांची छपरे उडून गेली आहेत. पावसाचे पाणी अनेक ठिकाणी शेतांमध्ये घुसले आहे. सुटीच्या निमित्ताने नेहमी फुलून जाणारी ठिकाणे आता एकदम निर्जन बनली आहेत. ओमानमध्ये 12 वर्षांच्या एका मुलीसह तिघेजण मरण पावले आहेत. तर आणखी दोन जणांचे मृतदेह येमेनमधील सोकोट्रामध्ये सापडले आहेत. सोकोट्रामध्ये अद्यापही 30 जण बेपत्ता आहेत. यामध्ये येमेन, भारतीय आणि सुदानी नागरिकांचा समावेश आहे.

येमेनच्या पूर्वेकडेला मोठे नुकसान झाले आहे. रगेह बक्रित या प्रांतात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरे कोलमडली आहेत. तेथे हजारो लोकांना सुरक्षित आश्रय छावण्यांमध्ये आसरा घ्यावा लागला आहे. तेथे पाणी पुरवठा आणि दूरसंचार यंत्रणा ठप्प झाली आहे. आगामी दोन दिवसात ताश्‍गी 200 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. पोलिस आणि प्रशासनाच्यावतीने मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button