breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांची प्रियांका गांधीनी घेतली भेट

  • पंतप्रधान नरेंद्र मोदीना देणार आव्हान

नवी दिल्ली – भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची  काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा आणि ज्योतिरादित्य सिंदिया यांनी मेरठ हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.

चंद्रशेखर आझाद यांनी नरेंद्र मोदींचा वाराणसीमधून पराभव करण्याचा चंग बांधला आहे. सपा आणि बसपाने वाराणसीमधून समर्थ उमेदवार दिला नाही तर आपण स्वत: मोदींवरुद्ध लढू, असंही त्यांनी जाहीर केलं आहे.

मुझफ्फरनगरमध्ये एक मोटरसायकल रॅली काढण्याच्या तयारीत असताना चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्यात आली आणि आजारी पडल्यामुळे त्यांना मेरठच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

हुंकार रॅलीला परवानगी नाकारली 

चंद्रशेखर आझाद यांनी मेरठमधल्या हुंकार रॅलीला हिरवा झेंडा दाखवला होता. ही रॅली मेरठहून निघून 15 मार्चला दिल्लीला पोहोचणार होती.  उत्तर प्रदेशमध्ये दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रियांका गांधींनी चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतल्याचं बोललं जातंय. मायावतींनी काँग्रेसशी आघाडी करण्याचं नाकारल्यामुळे प्रियांका गांधींना त्यांच्याविरुद्ध चंद्रशेखर आझाद यांची मदत घेणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button