breaking-newsमुंबई
भारतीय माजी हाॅकीपटू ‘संदीप मायकेल’ यांचे निधन
मुंबई – भारतीय हाॅकी रसिक एकीकडे हाॅकी विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याची वाट पाहत आहेत तर दुसरीकडे हाॅकी जगतातून एक दुखद बातमी आली आहे. भारताचे माजी हाॅकीपटू आणि आशिया कप सुवर्णपदक विजेत्या ज्युनियर संघाचे कर्णधार संदीप मायकेल यांचे शुक्रवारी मेंदूसंबंधीच्या विकारामुळे वयाच्या 33 व्या वर्षी निधन झाले.
2003 च्या आशिया कप स्पर्धेत ते भारतीय संघाचे कर्णधार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय ज्युनियर संघाने 2003 मध्ये ज्युनियर आशिया कप जिंकला होता. तसेच याच स्पर्धेत पाकिस्तान आणि कोरिया या संघाविरूध्द महत्वाच्या सामन्यात गोल करत महत्वाची कामगिरी बजावली होती.
त्यानंतर 2003 साली त्यांनी आॅस्ट्रेलियाचा दौरा केला होता. आॅस्ट्रेलियातील स्पर्धेमध्ये वरिष्ठ संघाकडून खेळताना त्यांनी दोन गोल केले होते.