breaking-newsराष्ट्रिय

भारतीय बनावटीची नवी ट्रेन १८० किमी प्रती तास वेगाने धावली

भारतामध्ये तयार करण्यात आलेली संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या नवीन ट्रेनच्या डब्ब्यांची चाचणी सध्या राजस्थानमध्ये सुरु आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीच या चाचणीचा एक व्हिडीओ ट्विटवरून शेअर केला आहे. या ट्विटमध्ये ही पूर्णपणे भारतीय बनावटीची रेल्वे १८० किलोमीटर प्रती तास वेगाने धावत असल्याचे गोयल यांनी नमूद केले आहे.

भारतीय रेल्वे नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रवास अधिक सुखकर आणि जलद करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचा एक भाग म्हणून भारतीय रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेमध्ये नवीन रचनेच्या रेल्वे डब्ब्यांचा समावेश करण्यात येणार आहे. याच रेल्वे डब्ब्यांची पहिली झलक काही दिवसांपूर्वीच सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. आज पियुष गोयल यांनी या गाडीच्या चाचणीचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत या ट्रेनची निर्मिती करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये या ट्रेनच्या वेगाची चाचणी घेण्यात आली. त्यावेळी ही ट्रेन १८० किमी/तास वेगाने धावताना दिसत आहे’

Embedded video

Piyush Goyal

@PiyushGoyal

Train 18, manufactured domestically under the ‘Make in India’ initiative, seen scorching the tracks at a phenomenal 180 kmph during speed trials in Rajasthan

4,062 people are talking about this

बुलेट ट्रेनसारख्या दिसणाऱ्या या नवीन गाड्या भविष्यात शताब्दी एक्सप्रेस ट्रेन्सच्या जागी चालवण्याचा विचार सुरु असल्याचे वृत्त आहे. इंजिनीची वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे हवेचा विरोध कमी होऊन ही ट्रेन सध्याच्या इंजिन असणाऱ्या ट्रेन्सपेक्षा अधिक जलद धावेल. या ट्रेनला जोडण्यात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या डब्ब्यांची निर्मिती आणि प्राथमिक चाचणी महाराष्ट्रात घेण्यात आली होती. त्यावेळीही या ट्रेनचे व्हिडीओ व्हायरल झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button