breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारताला बुलेट ट्रेन फुकटातच मिळतेय- मोदी

मेरठ: प्रखर इच्छाशक्ती असेल तर कठिणातली कठिण गोष्टदेखील साध्य होऊ शकते. २६/११ च्या हल्ल्यात जखमी होऊनही अतिरेक्यांचा खात्मा केलेले प्रवीण तेवतिया यांनी हे प्रत्यक्षात आणलं आहे. फुफ्फस आणि कानांना चिरून गेलेल्या दहशतवाद्यांच्या गोळ्यांना न जुमानता प्रवीण यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या जखमांवर मात केली. यातून बाहेर पडत त्यांनी ७२ कि.मी.ची मॅरेथॉन जिंकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

२६/११ ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी प्रवीण यांनी ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांचा सामना केला. फुफ्फुस आणि कानात गोळ्या लागूनही दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या ३२ वर्षीय तेवतिया यांचा शौर्यचक्र देऊन सन्मान करण्यात आला. मरीन कमांडो असणारे तेवतिया या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर सुमारे ५ महिने मृत्यूशी झुंज देत होते. ते वाचले पण अंशत: बधीर झाले. यानंतर त्यांना नौदलात नॉन-अॅक्टिव्ह ड्युटी देण्यात आली. प्रवीण यांनी आपण फिट असल्याचे दाखवण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरूवात केली. ९ सप्टेंबरला लडाख मध्ये झालेल्या ७१ कि.मी. लांबीच्या खारदुंग ला मॅरेथॉनमध्ये ते सहभागी झाले आणि त्यांनी पदकही जिंकले!

नौदलात ५ टक्के अपंगत्व पात्र ठरते, पण तेवतिया यांनी राजीनामा दिला. त्यांना ठाऊक होतं की ते आता पुन्हा कमांडो बनू शकत नाही, पण त्यांना डेस्क जॉब करायचा नव्हता. त्यांनी ते फिट असल्याचं सिद्ध करायचं ठरवलं. ताज हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने ते मॅरेथॉन धावपटू प्रवीण बाटीवाला यांना भेटले. २०१४ मध्ये प्रवीण यांचे मॅरेथॉन प्रशिक्षण सुरू झाले. मुंबई मॅरेथॉनमध्ये त्यांनी वेगळ्या नावाने सहभाग घेतला. २०१६ मध्ये इंडियान नेवी हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. त्यांनी १.९ कि.मी. स्विमींग, ९० कि.मी. सायकलिंग आणि २१ किमी धावण्याच्या स्पर्धेतही भाग घेतला. ते म्हणाले, ‘यानंतरही नौदलाला माझ्या फिटनेसवर विश्वास बसला नाही. मॅरेथॉनसाठी मी जास्त सुट्ट्या घेऊ शकत नव्हतो. त्यामुळे मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. माझी कोणाबद्दल तक्रार नाही. नौदलात माझ्या पदानुसार मला काम दिले गेले. पण मला जगाला हे सांगायचंय की मी तोच ताज हॉटेलमधला कमांडो आहे. मला स्वत:ला जगाला विसरू द्यायचे नाही.’

३१ जुलैला त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. शनिवारी ही १८,३८० फूट उंचीवरची मॅरेथॉन शर्यत १२.५ तासांत पूर्ण केली. आता त्यांना फुल इरॉन मेन ट्रायथलॉनमध्ये सहभागी व्हायचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button