breaking-newsराष्ट्रिय
भारतात पेट्रोल, डिझेल अधिक स्वस्त होणार !
दिल्ली- भारतात पेट्रोल, डिझेल अधिक स्वस्त होणार आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव घसरत असल्यामुळे पेट्रोल, डिझेल अधिक स्वस्त होणार असल्याचे चिन्ह आहे. अमेरिकेने इराणमधून तेल आयात करण्यावर निर्बंध लादले होते. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढत होते.
२० दिवसांत पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत पेट्रोल डिझेलचे भाव आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहेत. सध्या दिल्लीत पेट्रोल ७८ रुपये लिटर तर मुंबईत ८३ रुपये लिटरच्या भावाने मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी इंधनाचे दर ९० प्रयन्त पोहचले होते. त्यामुळे सामन्यांमध्ये नाराजी होती. इंधन दरवाढीविरोधात अनेक आंदोलने देखील करण्यात आली होती.