breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजप-शिवसेना युतीच्या जागा वाटपाचं सुत्र ठरलं !

मुंबई – शिवसेना-भाजपामधील जागा वाटपाचं सूत्र ठरल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा 25, तर शिवसेना23 जागा लढवणार असून विधानसभा निवडणुकीत भाजपा 145, तर शिवसेना 143 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाच मोठा भाऊ असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. युतीचा तिढा सोडवण्यासाठी भाजपाचे तीन दिग्गज नेते लवकरच मातोश्रीवर जाणार आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी हे तीन बडे युतीची बोलणी करण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याचं समजतं.

गेल्या लोकसभा निवडणुकीत एकत्र लढलेल्या भाजपा-शिवसेनेला राज्यात चांगलं यश मिळालं. मात्र त्यानंतर दोन्ही पक्षांचे संबंध बिघडले. त्यामुळे विधानसभेत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. या निवडणुकीच भाजपा राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला. तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली. यानंतर राष्ट्रवादीनं भाजपाला बिनशर्त पाठिंबा देऊ केला. त्यामुळे विधानसभेत बहुमत सिद्ध करताना भाजपाला अडचण आली. यानंतर ‘महाराष्ट्राच्या भल्यासाठी’ सत्तेत सहभागी होत असल्याचं म्हणत शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button