भाजप युवा मोर्चाच्या वतीने पिंपरी पाकिस्तानचा झेंडा जाळला
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पुलवामा येथे जवानांच्या वाहनावर झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज (शुक्रवारी) निषेध करण्यात आला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध नोंदविला. तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, भाजयुमोचे प्रदेश सचिव अनुप मोरे, भाजयुमोच्या सरचिटणीस वैशाली खाडये, अजित कुलथे, दिपक नागरगोजे, प्रविण सिंग, सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष धनंजय शाळिग्राम, भाजयुमोचे शहर उपाध्याक्ष मधुकर बच्चे, देवयानी भिंगारकर, अमित गुप्ता, विवेक महाजन, तेजस्वीनी कदम, योगेश सोनावणे, किशोर ब्राम्हणकर, राहुल शिंदे, अमोल दामले, मिथुन कुमार, मिहीर झा, सागर फुगे, भागवत मुंडे, योगेश भागवत, गणेश जवळकर, गणेश संभेराव, साई कोंढरे, अभिजीत बागुल, यश तावरे, शुभम चॉंद, दिलीप गोसावी आदी उपस्थित होते