breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप नगरसेविका सुजाता पालांडे यांचा जामिन अर्ज फाटाळला

पिंपरी – संत तुकारामनगर येथील टपरीधारकाला आत्महत्तेस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या भाजपच्या नगरसेविका सुजाता पालांडे यांचा जामिन अर्ज पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे पालांडे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

नेहरूनगर येथे फेब्रिकेशनचा व्यवसाय करणारे टपरीधारक सचिन सुरेश ढवळे (रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी पंधरा दिवसांपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करताना त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये भाजप नगरसेविका सुजाता पालांडे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद आहे. याबाबत सचिनचा भाऊ शरद सुरेश ढवळे (वय-38) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पालांडे यांच्यासह मृत सचिन ढवळे याची पत्नी शशिकला सचिन ढवळे (वय-40, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी पालांडे यांनी शहर सोडले. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात जामिन अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे पालांडे यांना अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग आता सोपा झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button