breaking-newsमहाराष्ट्र

भाजप नगरसेवकाकडून महिला अधिकाऱ्यास अश्लील संदेश

बीड – भाजप नगरसेवकाने एका महिला अधिकाऱ्याच्या भ्रमणध्वनीवर अश्लील संदेश पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिला अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नगरसेवक फरार झाला आहे.बीड जिल्ह्यतील केज येथील एका महिला अधिकाऱ्याच्या भ्रमणध्वनीवर फोन केल्यानंतर तो न घेतल्याने त्यांना अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक रवि अंधारे यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात विनयभंग व सायबर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बारा ते दीड वाजण्याच्या दरम्यान महिला अधिकाऱ्याला तब्बल सात वेळा फोन करण्यात आले. अनोळखी क्रमांक असल्याने त्यांनी फोन घेतला नाही. पहाटे साडेपाच वाजता उठल्यानंतर त्यांच्या भ्रमणध्वनीवर सात सुटलेले कॉल दिसून आले. त्यानंतर त्याच क्रमांकावरून त्यांना अश्लील संदेश आल्याचे दिसले. कार्यालयात आल्यानंतर त्यांनी निनावी फोन करणाऱ्याचा शोध घेतला असता तो क्रमांक केज येथील भाजपचे नगरसेवक रवि अंधारे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी अंधारेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button