breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भाजप नगरसेवकांच्या पाट्यांचा अर्धहिरवा-केशरी रंग काढा – मनसेची मागणी

  • मनसेचे शहर सचिव रुपेश पटेकर यांनी दिले आयुक्तांना निवेदन

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच भाजपला सत्ता मिळाल्याने नगरसेवकांचे लाड पुरविण्यासाठी प्रशासनाकडून नियम पायदळी तुडवले जात आहेत. पक्षवाढीच्या हट्टासाठी नगरसेवकांची निवासस्थाने, जनसंपर्क कार्यालये याकडे जाण्यासाठी लावलेल्या दिशादर्शक पाट्यांचा रंग भाजपच्या झेंड्यासमान आहे. हे बेकायदेशीर असून केवळ महापौर नितीन काळजे यांच्या पाटीचा रंग नियमात आहे. तरी, भाजप नगरसेवकांच्या पाट्यांचा रंग त्वरीत बदलावा, अन्यथा खळ्ळखट्ट्याक आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे शहर सचिव रुपेश पटेकर यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे एकूण 32 प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये चार नगरसेवकांप्रमाणे शहरात 128 नगरसेवक आहेत. त्यामध्ये भाजपचे 77, राष्ट्रवादीचे 36, शिवसेनेचे 9, अपक्ष 5 आणि मनसेचा एक नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. भाजपच्या नगरसेवकांची मागणी विचारात घेऊन पालिकेच्या स्थापत्य विभागाकडून प्रत्येकी पाच ते सहा दिशादर्शक फलक देण्यात आले आहेत. एका फलकाची किंमत एमएस बोर्ड 4 हजार 500, एसएस बोर्ड 8 हजार एवढी आहे. प्रत्येकी चार ते सहा फलकांप्रमाणे एकूण 500 ते 600 फलक दिले आहेत. त्यावर स्थापत्य विभागाचा 3 ते 4 कोटी रुपये खर्च झाला आहे. हे पैसे विनाकारण वायफळ खर्च होत असताना फलकाचे रंग निवडून नियमांचे उल्लंघन केले आहे. ही बाब पटेकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निदर्शनात आणून दिली आहे. यासंदर्भात आयुक्तांना निवेदनही दिले आहे.

भाजपच्या नगरसेवकांनी आपली निवासस्थाने, जनसंपर्क कार्यालये याकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक लावले आहेत. मात्र, फलकांचा रंग भाजपच्या झेंड्याप्रमाणे अर्थहिरवा-केशरी असा आहे. मुळात हा रंग भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याचा आहे. मात्र, हा रंग फलकांवर लावण्यासाठी नगरसेवकांना पक्षश्रेष्टींकडून निर्बंध घातले आहेत. कारण, भाजपचा प्रसार मनामनात करण्याचा उद्देश यामागे आहे, असा आरोप पटेकर यांनी केला आहे. तसेच, स्थापत्य विभागाकडून फलकांसाठी दिली जाणारी रक्कम वायफळ खर्च केली जात आहे. अशा फलकांचा अर्धहिरवा-केशरी रंग त्वरीत बदलण्यात यावा, अन्यता मनसेकडून खळ्ळखट्ट्याक आंदोलन केले जाईल, असा इशारा पटेकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button