breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपाने लोकशाहीचा गळा घोटला; राष्ट्रवादीच्या गोंधळावर शिवसेना-मनसेने घेतली शंका

शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसेचे सचिन चिखलेचा आरोप 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महासभेत चिंखलीचे संतपीठ, भोसरी रुग्णालय खासगीकरण आणि पीएमपीएमएल बसेस खरेदी असे महत्वाच्या विषयावर राष्ट्रवादी काॅंग्रेसने गोंधळा घातला आणि त्याच गोंधळात भाजपाने सर्वच विषयाला मंजुरी दिली. त्यामुळे सभागृहात अन्य पक्षाच्या नगरसेवकांना सत्ताधारी आणि विरोधक बोलू दिले जात नाही. यामुळे राष्ट्रवादीच्या गोंधळावर आम्हाला शंका येवू लागलीय, अशी टीका शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी केली. 

पिंपरी चिंचवड महापालिकेची आज ( सोमवारी) महासभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. सभेच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी नगरसेवकांना घेवून आंदोलनाला सुरूवात केली. त्यांनी संतपीठाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करुन भाजप विरोधात घोषणा दिल्या. त्यावरुन सभागृहाचे कामकाज एक  तास तहकूब केले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यावरही राष्ट्रवादीचा गोंधळ सुरू होता. दरम्यान गोंधळाच्या वातावरणातच महापौरांनी अन्य विषयाला चर्चेविना मंजूरी दिली.

यावर राहुल कलाटे म्हणाले की, महासभेत राष्ट्रवादीने सभागृहात झालेला गोंधळ चुकीचा होता. चर्चा करूनच संतपीठाचा प्रस्ताव मंजूर करणे योग्य होते. संचालकपदी वारकरी सांमप्रदायिक मंडळींचा समावेश करणे आवश्यक होते. संचालक मंडळावर महापौर, गटनेते, पदाधिकारी यांचा सहभाग अपेक्षित होता. मात्र कोणालाही विश्वासात न घेता, आम्हाला बोलू न घेता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या विषयांवर मतदान घेणे गरजेचे होते. झालेल्या गोंधळामुळे शंकेला जागा निर्माण होत आहे.

सचिन चिखले म्हणाले की, भोसरीतील महापालिकेचे हॉस्पिटल खाजगी तत्वावर चालविण्यास देण्यास मनसेचा तीव्र विरोध आहे. आर्थिक निकष ठरवून सर्वांनाच मोफत उपचार देणे गरजेचे होते. ३० वर्षासाठी हे हॉस्पिटल चालवायला दिले जाणार आहे. कोणाचेही नियंत्रण तेथे राहणार नसल्यामुळे मनमानी कारभार चालणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button