breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

भाजपाच्या महापौरांचे राज ठाकरेंसमोर लोटांगण

पिंपरी :- रिक्षा चालक ते पिंपरी-चिंचवडचे महापौर अशी भाजपाचे राहुल जाधव यांची ओळख आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून राजकारणाला सुरूवात करणाऱ्या जाधव यांनी भाजपामध्ये प्रवेश करत थेट महापौरपदही मिळवले. भाजपात असूनही त्यांचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावरील प्रेम अजूनही कमी झाले नसल्याचे त्यांच्या कृतीवरून दिसून आले. एका खासगी जिमच्या उद्घाटनासाठी आलेल्या राज ठाकरे यांच्यासमोर जाधव यांनी थेट लोटांगणच घातले. जाधव यांच्या या कृतीमुळे मात्र राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगल्याचे दिसून येते.

राज ठाकरे यांनी मनसेची स्थापन केल्यानंतर जाधव यांनी मनसेत प्रवेश करत राजकारणातील श्रीगणेशा केला. त्यांनी पक्षाचा विस्तारासाठी कठोर परिश्रम घेतले. याचे फळ म्हणून २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांनी जाधव यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली. जाधव यांनी हा विश्वास सार्थ ठरवला. ते बहुमताने विजयी आले. त्यानंतर त्यांनी वर्ष २०१७ मध्ये आमदार महेश लांडगे यांच्यासोबत भाजपात प्रवेश केला. भाजपामधून नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर जाधव यांना महेश लांडगे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले.

पक्षानेही त्यांना महापौरपदाची संधी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपाचे दुसरे महापौर होण्याचा त्यांना बहुमान मिळाला. पण राज ठाकरे हे पिंपळे-गुरव येथे आल्याचे समजताच जाधव यांनी तेथे धाव घेतली आणि पक्षभेद विसरत राज यांचे आशीर्वाद घेत त्यांच्यासमोर लोटांगणच घातले. भाजपात असलो तरी राज ठाकरे यांच्यावरील आपले प्रेम कमी झाले नसल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button