breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपविरोधी आंदोलनकर्त्यांची ‘चमकोगिरी’

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समोर सत्ताधारी भाजपच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, हे आंदोलन विविध गटांत विभागले गेल्यामुळे आंदोलनातील नियोजित मानवी साखळी बाजुला राहिली असून फोटो सेशनमध्ये आंदोलनकर्ते दंग झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हे भाजप विरोधी आंदोलन आहे की, शहरातील प्रलंबित प्रश्नांवर नागरिकांची केलेली थट्टा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे, शास्ती कर, संतपीठात अफरातफर, भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण आणि पीएमपीएमएल बस खरेदीच्या विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आणि विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने सत्ताधारी भाजपच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर आंदोलन सुरू झाले. मात्र, आंदोलनाचे नियंत्रण सुटल्याने आंदोलनकर्त्यांचे वेगवेगळे गट तयार झाले. आंदोलनातील मानवी साखळी बाजुला राहिली असून मोबाईलद्वारे सेल्फी आणि प्रसार माध्यमांसमोर फोटोसेशन करण्यातच पुढारी दंग झाल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे विरोधकांच्या या आंदोलनाचा पुर्ता फज्जा उडाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button