breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपला पराभवाचा ‘धक्का’, स्थानिक नेत्यांनी घेतला ‘धसका’

  • मोदी लाटेचा करिश्मा उतरला
  • दोन्ही आमदारांचे वाढले टेंशन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असताना आज पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपला जोरदार झटका दिला आहे. तेलंगणा आणि मिझोरममध्ये भाजपला डोके सुध्दा वर काढू दिले नाही. राजस्तान, छत्तीसगढ, मध्यप्रदेशमध्ये आशेचा किरण दिला आहे. परंतु, काँग्रेसला बहुमत असल्याने भाजपला सत्तेपासून मतदारांनी लांब फेकले आहे. पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या पदाधिका-यांनी याचा चांगलाच धसका घेतल्याची चर्चा कार्यकर्त्यांत सुरू आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा करिश्मा दिसू लागल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. राष्ट्रवादीला नामोनिशाण मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पदाची धुरा आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर सोपविली. त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपची सत्ता आणली. मात्र, सत्ता येताच एक वर्षाच्या कार्यकाळात नगरसेवकांनी भाजपच्याच कारभारावर नाराजी व्यक्त करायला सुरूवात केली. पक्षांतर्गत काहींचा उपद्रव वाढल्याने शहराच्या विकासाचा दृष्टीकोण बाळगणारे काही कर्तृत्वशिल नगरसेवक स्वतःच्या प्रभागापुरतेच लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यामुळे महापालिकेतील कारभार सैरभैर सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. चालू पंचवार्षिकीत भाजपची सत्ता मिळाल्याने काम करण्याची संधी आहे. परंतु, सत्ताधारी भाजप पदाधिका-यांना त्याचे विस्मरण झाले आहे.

शहर भाजप तीन गटात विभागली गेल्याने कोणाचाही मेळ नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पालिकेतील पदाधिक-यांची तोंडे चारी दिशेला असल्यामुळे प्रश्न सोडविण्याचे आशेने पालिकेत गेलेल्या सामान्य नागरिकाला नाराजी पत्करून परतावे लागत आहे. अशी परिस्थिती असतानाच आता पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदारांनी चांगलाच धडा शिकविला आहे. मध्यप्रदेशमध्ये भाजप-काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर होत आहे. राजस्तानमध्ये काँग्रेसच्या हाती सत्ता जात आहे. छत्तीसगढमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे. तेलंगणा आणि मिझोराममध्ये तर भाजपला हालचाल देखील करू दिली नाही. एकंदरीत, या निकालावरून मोदी लाटेचा आसर नागरिकांच्या मनातून उतरल्याचे सिध्द होत आहे. त्यातच आता लोकसभा झाल्यानंतर विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. मतदारांनी जर ठरवले तर आपले काय होणार, अशी चिंता भाजपच्या दोन्ही आमदारांना भेडसावत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button