breaking-newsराष्ट्रिय

भाजपच्या लोकसभेतील संख्याबळात घट ; बहुमत कायम

नवी दिल्ली- देशाच्या विविध भागांत आज झालेल्या पोटनिवडणुकांत बसलेल्या हादरऱ्यामुळे भाजपचे लोकसभेतील संख्याबळ घटले. अर्थात, त्या पक्षाकडे बहुमत कायम राहिले असले तरी ते काठावरचे आहे. लोकसभेवर जनतेतून निवडून दिल्या जाणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या 543 इतकी आहे. देशात 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवताना भाजपने स्वबळावर बहुमताचा आकडा पार केला. त्यावेळी भाजपने 282 जागा जिंकल्या.

मात्र, त्यानंतर झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकांत भाजपची पीछेहाट होताना दिसली. ताज्या पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला. त्यामुळे भाजपचे संख्याबळ आता 272 पर्यंत खाली आले आहे. लोकसभेतील 4 जागा सध्या रिक्त आहेत. याशिवाय, 2 नामनियुक्त सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे सध्या 541 इतके संख्याबळ असणाऱ्या भाजपचे 274 सदस्य आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे लोकसभेतील एकूण संख्याबळ 315 इतके आहे. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या स्थिरतेला सध्या तरी कुठलाही धोका नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button