breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपच्या नगरसेवक, पदाधिका-यांना उद्याच्या निकालाची धास्ती

  • अनेकजणांचे मोबाईल झाले बंद
  • अनेकांनी शहराबाहेर ठेवले प्रस्थान

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या विद्यमान नगरसेवक आणि पदाधिका-यांनी लोकसभा निवडणूक निकालाची चांगलीच धास्ती घेतली आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या विरोधात प्रचार करण्याचे नाटक करून ऐन मतदानाच्या चार दिवस अधीपासून सेनेचा प्रचार करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. त्यांनी किती प्रामाणीकपणे युतीधर्म पाळला हे उद्याच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे भाजपच्या जुन्यानव्या पदाधिकारी, नगरसेवकांनी याची चांगलीच धास्ती घेतली आहे.

शिवसेना-भाजप युती झालेली असली तरी मावळ आणि शुरूर लोकसभा मतदार संघावर गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेचे प्राबल्य कायम टिकून आहे. त्यापैकी मावळ मतदार संघ भाजपला राखून ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून शहर भाजपचे सुमारे पन्नास नगरसेवक आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी केली होती. अन्यथा युतीच्या उमेदवाराचा पराभव अटळ समजावा, असा गर्भीत इशारा दिला होता. शेवटी वरीष्ठ स्तरावर युतीधर्म पाळून दोन्ही जागा शिवसेनेला सोडण्यात आल्या. त्यामुळे ज्यांनी युतीच्या उमेदवाराच्या विरोधात बंडाचा इशारा दिला होता. त्यांच्यावर ऐन निवडणुकीत प्रचार करण्याची वेळ आली. त्यांनी किती प्रमाणीकपणे काम केले याचा लोखेजोखा केला जाणार आहे. उद्या मतमोजणी झाल्यानंतर असलीयत समोर येणार आहे.

मनापासून काम केलेल्या पदाधिका-यांच्या मनामध्ये कसलीही भिती बाळगण्याचे कारण नाही. परंतु, ज्यांनी युतीचे काम करत असल्याचे भासवून युतीधर्म पाळला नाही, अशांना मात्र कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्याची चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र दिसत आहे. भाजपचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक आजपासूनच नॉट रिचेबल आहेत. तर, अनेकजणांनी शहराबाहेर प्रस्थान ठेवल्याची चर्चा आहे. उगीच पराभवाचे खापर आपल्या माथ्यावर नको, या भितीपोटी अनेकांनी आपले मोबाईल स्वीच ऑफ ठेवले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button