breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतले पालखीचे दर्शन

पुणे – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले.

भाजपाचे अध्यक्ष शहा हे आज दुपारी काही कामानिमित्त पुण्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह पुण्यातील भाजपच्या पदाधिका-यांनी त्यांचे लोहगाव येथील विमानतळावर स्वागत केले. पुण्यातील दोन कार्यक्रमांना शहा उपस्थिती लावणार आहेत. बालगंधर्व येथील कार्यक्रम उरकून ते गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित कार्यक्रमात “आर्य चाणक्य” या विषयावर ते व्याख्यान देणार आहेत.

भाजपच्या संपर्क फॉर समर्थन या अभियानाअंतर्गत अमित शहा हे बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेणार आहेत. पुण्यातील पुरंदरे वाड्यात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही भेट होणार आहे. याशिवाय शहरातील इतरही काही मान्यवरांच्या ते भेटी घेणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button