breaking-newsराष्ट्रिय

भाजपचे आमदार बी. एन. विजयकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बंगळूरू : भाजपचे कर्नाटकातील आमदार बी.एन.विजयकुमार यांचे आज (शुक्रवारी) सकाळी बंगळुरुतील रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. निवडणुकीच्या तोंडावर विजयकुमार यांच्या निधनाने भाजपला झटका बसला आहे.

जयानगर विधानसभा मतदारसंघात प्रचारात व्यस्त असताना विजयकुमार अचानक खाली कोसळले. त्यांना जयादेवा या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी आपल्या बाजूने विजयकुमार यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही असे भाजप प्रवक्ते एस. प्रकाश यांनी सांगितले. बी. एन. विजयकुमार  जयानगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button