breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

भाजपची 250 उमेदवारांची यादी तयार; अनेक दिग्गजांना दाखविला घरचा रस्ता

नवी दिल्ली –  सत्ताधारी भाजपानं उमेदवारांची घोषणा केलेली नसली तरी पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी जवळपास 250 उमेदवारांची यादी तयार केल्याची माहित मिळत आहे. या यादीतील उमेदवारांची नावे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल, असे पक्षातील नेते बोलत आहेत. भाजपाच्या संसदीय समितीनं उमेदवारांची यादी तयार केली आहे. त्यात अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आल्याची माहिती नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना तिकीट मिळणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री बी. सी खंडुरी आणि बी. एस. कोश्यारी यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षानं तरुणांना संधी द्यावी, अशी भूमिका या दोन्ही नेत्यांनी घेतली आहे. माजी केंद्रीय मंत्री कलराज मिश्र (2014 मध्ये देवरियामधून विजयी) आणि लोकसभेचे माजी उपाध्यक्ष करिया मुंडा यांनीदेखील लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी स्वत:हून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानं आता मार्गदर्शक मंडळातील नेत्यांचं काय होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार स्वत: माघार घेणार, की तरुणांना संधी देण्यासाठी पक्षाकडून त्यांची तिकीटं कापली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सध्या अडवाणींचं वय 91 वर्षे, तर जोशींचं वय 85 वर्षे आहे. 2014 मध्ये या दोन्ही नेत्यांचा समावेश मार्गदर्शक मंडळात करण्यात आला. पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या नेत्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं काही महिन्यांपूर्वी घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button