breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपकडून आंध्र, भामा आसखेड पाणी आरक्षण मंजुरीच्या श्रेयाचे “ढोल”

  • महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची टिका
  • माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकाळात मंजुरीचा दावा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पवना, आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून पिण्याचे पाणी देण्यासाठीच्या आरक्षणास राज्य सरकारच्या मंत्री उपसमितीने फक्त मुदतवाढ दिली. या धरणातील पाण्याच्या आरक्षणास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच मंजुरी दिली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या वेळकाडूपणामुळे पाण्याचे आरक्षण रद्द झाले होते. आता शहरासाठी आम्ही पाण्याचे आरक्षण मंजुर केल्याचे ढोल भाजपचे पदाधिकारी बडवत आहेत. हे भाजपचे सर्वात मोठे अपयश असल्याची टिका पालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

पवना धरणातून चौथ्या टप्प्यासाठी 48.567, आंद्रा धरणातून 38.87 आणि भामा आसखेड धरणातून 60.79 दलघमी पाणी आरक्षणाला राज्य सरकारच्या मंत्री उपसमितीने मुदतवाढ दिली आहे. त्याचबरोबर सिंचन पुनर्स्थापनेसाठी सुमारे 238 कोटी रुपये पुढील पाच वर्षात टप्पाटप्पाने समान हप्त्यांमध्ये भरावे लागणार आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे नेते व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदा मंत्री असतानाच पवना, आंद्रा व भामा आसखेड धरणातून पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणास मंजुरी मिळाली. मात्र, भाजप सरकारच्या थोतांड कारभारामुळे धरणांसाठीच्या पुनर्स्थापना खर्चापोटी 238 कोटी पालिकेने विहित मुदतीत न भरल्याने गेल्या 23 जुलै 2018 रोजी जलसंपदा विभागाने हे आरक्षण रद्द केले होते. मनपा आयुक्तांनी एप्रिल महिन्यात फेरप्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार मंत्री उपसमितीने पूर्वीच्याच आरक्षणास मुदतवाढ दिली आहे. आरक्षणास मुदतवाढ मिळल्यानंतर मात्र पालिकेतील पदाधिकाऱ्यांपासून ते आमदार, पालकमंत्र्यापर्यंत आमच्यामुळेच आरक्षण मंजुरी मिळाले असल्याची श्रेयाची ढोलकी वाजविली जात असल्याचा आरोप साने यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या दोन वर्षापासून भाजपची सत्ता आहे. परंतु, दोन वर्षात भाजपने एक तरी असा प्रकल्प किंवा विकास काम दाखवावे. हे आमचे खुले आव्हान आहे. राष्ट्रवादीच्या काळातील मंजुर कामे नाव बदलून त्यात वाढीव कामे काढून ती कामे आम्ही केली असे शहरातील जनतेपुढे चित्र रंगविले जात असल्याचेही साने यांनी म्हटले आहे. जनतेच्या मुलभूत पाणी-कचरा समस्या भाजपकडून सुटत नाहीत, हे काय विधायक विकास कामे करणार, असा सवाल साने यांनी केला आहे. भाजपच्या अंतर्गंत गटबाजीमुळे व भष्ट्राचारामुळे शहरातील विकासाचा बट्याबोळ झाला आहे. भाजपचे पदाधिकारी फक्त आश्वासनाची गाजरे दाखवित असल्याचेही मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button