breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाईजानला दिलासा, दोन दिवसांनंतर जामीन मंजूर

जोधपूर – 1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खान ला आज 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.  मात्र उच्च न्यालयातील अपीलासाठी शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करुन सलमान संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत तुरुंगाबाहेर येईल. रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान तो बांद्रयातील आपल्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचू शकतो.

सलमानच्या जामिनाला सरकारी वकिलांनी तीव्र विरोध केला होता. सलमानला आतापर्यंत जेव्हा जेव्हा जामिन मिळाला त्यावेळी त्याने कधीही जामिनाच्या अटींचे उल्लंघन केलेले नाही त्यामुळे त्याला जामीन मंजूर करावा अशी विनंती त्याच्या वकिलांनी केली होती. अखेर न्यायाधीशांनी बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य करुन सलमानला जामीन मंजूर केला. सलमानची सुटका होणार हे स्पष्ट होताच जोधपूर कोर्ट परिसर आणि मुंबईतील त्याच्या घराबाहेर एकच जल्लोष सुरु झाला. देशाच्या वेगवेगळया भागातून आलेले चाहते सलमानच्या घराबाहेर जमले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button