breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘भगवानबाबां’च्या जन्मभूमीत पंकजा मुंडेचा ‘दसरा मेळावा’

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून कार्यकर्ते जाणार 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी बहूजन, वंचित व ऊसतोड कामगारांसाठी सुरु केलेला दसरा मेळावा यंदाही राष्ट्रसंत भगवानबाबाच्या जन्मभूमी असलेल्या सावरगाव-घाट (ता.पाटोदा, जि.बीड) याठिकाणी 18 आॅक्टोबरला होणार आहे. या मेळाव्यासाठी पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातून हजारो कार्यकर्ते जाणार आहेत, अशी माहिती पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी दिली.  यावेळी नगरसेवक केशव घोळवे, नगरसेविका योगिता नागरगोजे, अॅड. मोरेश्वर शेंडगे, माऊली थोरात, दिपक नागरगोजे, अरुण पवार आदी उपस्थित होते.  

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव-घाट याठिकाणी राष्ट्रसंत भगवानबाबा मुर्ती प्रतिष्ठापणा आणि दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मागील 30 वर्षापासून स्वर्गीय गोपीनाथ  मुंडे यांनी दसरा मेळाव्यातून बहूजन, वंचित आणि ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. तीच परंपरा महिला व बालविकास कल्याणमंत्री पंकजा मुंडे पुढे घेऊन जात आहेत. यंदाच्या दसरा मेळाव्याला सर्व समाज घटकातील, वारकारी संप्रदायातील लोक उपस्थित राहणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button