breaking-newsआंतरराष्टीय

ब्रिटनमध्ये शाही विवाहसोहळ्याचा जल्लोष

लंडन : हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्केल व ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी आज विवाहबंधनात अडकणार आहेत. ब्रिटनमध्ये मोठ्या जल्लोषात हा शाही विवाहसोहळा पार पडेल. विंडसर कॅसलमधील सेंट चार्ज चॅपल चर्चमध्ये मेगन व प्रिन्स हॅरी यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. मेगन मार्कलचे वडील थॉमल मार्केल आजारी असल्याने लग्नाला हजर राहणार नाहीत. म्हणून प्रिन्स चार्ल्स मेगनला चर्चपर्यंत घेऊन जाणार आहेत. दरम्यान, प्राणी हक्कांसाठी लढणारी स्वयंसेवी संस्था ‘पेटा’ या नवजोडप्याला एक बैलाचे चित्र भेट देण्यात येणार आहे. मेरी असं या बैलाच नाव असून हे नाव मेगन आणि हॅरी या नावांवरून ठेवण्यात येणार आहे.

मेगन व प्रिन्स हॅरी यांच्या शाही विवाहामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. लग्नासाठी एक लाखांहून जास्त लोक विंडसर कॅसलमध्ये पोहोचले आहेत. या ठिकाणी सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. पोलिस, गुप्तचर अधिकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांवर शाही जोडीला संरक्षण पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मेगन मार्केल व प्रिन्स हॅरीच्या विवाहासाठी बॉलिवूडची अभिनेत्री व मेगन मार्केल यांची खास मैत्रिण प्रियंका चोप्रालाही निमंत्रण देण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button