breaking-newsमनोरंजन

बोनी कपूर यांचे दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन

कपूर घराण्यातील तरुण पिढीला पुढे आणण्यासाठी प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर पुन्हा दिग्दर्शन क्षेत्रात उतरणार आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटात अर्जुन कपूर, जान्हवी कपूर या बहीण भावासोबत त्यांच्या काकांच्या मुलांच्याही भूमिका असणार आहेत. प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये तशी इच्छा बोलून दाखवली.

या चित्रपटात अर्जुन कपूर, जान्हवी कपूर या बहीण भावासोबत अनिल कपूर, संजय कपूर या दोघांच्याही मुलांचा समावेश या चित्रपटात असेल आणि त्यांच्यासाठी मी दिग्दर्शन क्षेत्रातही पुनरागमन करेन, असे ते म्हणाले.
भारतीय सिनेमा तांत्रिकदृष्ट्या ऑस्करच्या तुलनेत सुरुवातीपासूनच वरचढ असल्याचे त्यांनी सांगितले. सहाय्यक एडिटर, सहाय्यक दिग्दर्शक अशा भूमिकेतून निर्माता झालो. अभिनयाचा प्रांत अनिल कपूरसाठी सोडल्याचे सांगून कपूरांची नवी शाखा आता सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान जान्हवी कपूर आणि बोनी कपूर दोघेही श्रीदेवीच्या आठवणीने भावविवश झाले. ती सुपरस्टार होती. मॉमसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पण तिच्या हयातीत तो पुरस्कार मिळायला हवा, अशी खंत बोनी कपूर यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button