breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

बेस्ट प्रवास लवकरच सुखकर

बेस्ट प्रवाशांना मोबाइल अ‍ॅपवर बसची सद्य:स्थिती समजणार; येत्या जानेवारी २०१९ पासून सुविधा

बेस्टच्या थांब्यावर तासन्तास ताटकळ उभे राहणाऱ्या प्रवाशाला बसची सद्य:स्थिती मोबाइल अ‍ॅपवरही समजणार आहे. अशा प्रकारची सुविधा लवकरच बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांना दिली जाईल. त्यासाठी मोबाइल अ‍ॅप आणि बेस्टच्या काही थांब्यावर इंटिकेटरची सुविधा देण्यात येणार आहे.

प्रवाशांसाठी ही सुविधा प्रत्यक्षात जानेवारी २०१९ पासून येईल, अशी माहिती बेस्टमधील सूत्रांनी दिली. बेस्टमध्ये इन्टेलिजेंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीममार्फत (आयटीएमएस) मोबाइल अ‍ॅप, नव्या इंडिकेटरची सुविधा राबविली जाणार असून त्याची अंमलबजावणी व नियंत्रण ठेवण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. त्या प्रस्तावाला बेस्ट समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे.

रेल्वे स्थानकातील फलाटावर असणाऱ्या इंडिकेटरवर येणाऱ्या लोकल गाडय़ांच्या वेळेची माहिती प्रवाशांना दिली जाते. तशाच प्रकारची यंत्रणा प्रवाशांना देण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शासनाचा उपक्रम असलेल्या इन्टेलिजेंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीममार्फत (आयटीएमएस) बेस्ट प्रवाशांना बसच्या सद्य:स्थितीची माहिती उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयटीएमएस यंत्रणेला मंजुरी मिळाल्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून त्यावर काम केले जात आहे.

बेस्ट प्रवाशांना बसच्या सद्य:स्थितीची माहिती देण्यासाठी आयटीएमएसमार्फत बेस्टच्या बस गाडय़ांमध्ये व्हेइकल ट्रॅकिंग यंत्रणा बसविली जाणार आहे. एवढय़ा मोठय़ा यंत्रणेवर नियंत्रण ठेवता यावे आणि प्रवाशांना चांगली सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता त्याच्या अंमलबजावणीसाठी सल्लागार नेमण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या कंत्राटाचा कालावधी हा नऊ महिन्यांचा असणार आहे.

अ‍ॅप असे

बेस्टमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट प्रवाशांना येणाऱ्या बसची माहिती देण्यासाठी मोबाइल अ‍ॅप बनविले जात आहे. या अ‍ॅपवर बस गाडय़ांची सद्य:स्थिती दिली जाईल. त्यामुळे प्रवाशांना सहजतेने बस उपलब्ध होणार आहे. मुंबईतील काही बस थांब्यांवर नवीन इंडिकेटरही बसविले जाणार आहेत. त्यावरही बसच्या सद्य:स्थितीची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ही सुविधा प्रवाशांसाठी जानेवारी २०१९ पासून उपलब्ध होईल. परंतु त्याआधी बेस्टच्या पायाभूत सुविधांची अचूक माहिती कर्मचारी व अधिकाऱ्यांना उपलब्ध करण्यासाठी प्रथम त्यांच्यासाठी ही यंत्रणा अमलात येईल. वडाळा व बॅकबे आगारात यंत्रणा राबविल्यानंतर उर्वरित आगारांमध्येही त्याची अंमलबजावणी केली जाईल. त्यानंतरच नवीन वर्षांत प्रवाशांना मोबाइल अ‍ॅप व नवीन इंडिकेटरची सुविधा मिळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button