breaking-newsआंतरराष्टीय

बेल्जियममध्ये दहशतवादी हल्ल्यात तिघे ठार

  • हल्लेखोर पोलिस गोळीबारात ठार

लिग (बेल्जियम) – एका हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यामध्ये दोन पोलिस अधिकाऱ्यांसह तिघेजण ठार झाले. या हल्लेखोराने पोलिसांच्याच बंदुकीने हा गोळीबार करून रस्त्यावरच्या एका व्यक्‍तीलाही ठार केले. या हल्लेखोराला पोलिसांनी नंतर गोळ्या घालून ठार केले.

बेल्जियममधील लिग शहरामध्ये सकाळी 10.30 वाजता ही घटना घडली. हातात चाकू घेतलेल्या या हल्लेखोराने दोन पोलिस अधिकाऱ्यांवर वार केले आणि त्यांच्याकडील बंदुक काढून घेऊन गोळीबार करून या पोलिसांना ठार केले. त्याने हल्ला करण्यापूर्वी या अधिकाऱ्यांचा पाठलागही केला होता. या पोलिसांना ठार केल्यानंतर पार्किंग केलेल्या एका कारमधील 22 वर्षीय एका युवकालाही त्याने गोळ्या घातल्या. या हल्ल्यानंतर हा हल्लेखोर लिओनी दे वाहा या शाळेमध्ये घुसला. तेथील एका कर्मचारी महिलेला त्याने ओलिस धरून ठेवले. दरम्यान तेथे पोहोचलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर हल्लेखोराने पोलिसांच्या दिशेने गोळीबार करत पळ काढला. त्या गोळीबारामध्ये काही जण जखमी झाले. पण पोलिसांच्या गोळीबारात हा हल्लेखोर ठार झाला. हा हल्लेखोर कालच तुरुंगातून सुटला होता. त्याचा कट्टरवाद्यांशी अल्पपरिचयही होता, अशी माहिती आहे.

पंतप्रधान चार्ल्स मायकेल यांनी या भ्याड हिंसाचाराचा निषेध केला आहे. या संदर्भात दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता लक्षात घेऊन तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. या हल्ल्यामुळे बेल्जियममध्ये “हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. ब्रुसेल्समध्ये इस्लामिक स्टेटने 2016 साली दोन आत्मघातकी बॉम्बस्फोटही केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button