breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बेरोजगार तरुणांना संधी; भोसरीत होणार भारतीय वायुसेना भरती

  • राज्यातील २७ जिल्ह्यांसाठी दि. २३ व २६ जुलै दोन दिवस थेट भरती

पिंपरी, ( महा ई न्यूज ) – देशाच्या संरक्षणासाठी सैन्यात भरती व्‍हावे, असे बहुतांश युवकांचे स्वप्न असते. अशा ध्येयवेड्या युवकांसाठी भारतीय वायुसेनेत भरती होण्याची संधी भोसरीत उपलब्ध होणार आहे. माजी सैनिक संघा, भोसरी विधानसभा यांच्या पाठपुराव्यामुळे हा भरती ‘कॅम्प’ आयोजित केला आहे.

भारतीय वायुसेना प्रशासन, महेश लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि व्हिजन अकॅडमीच्या वतीने भोसरीतील गावजत्रा मैदानावर (दि. २3 जुलै  आणि  दि.२६ जुलै २०१९ रोजी सकाळी ६ ते १० या वेळेत हा भरती होणार आहे. भारतीय वायुसेनेतील ‘गरुड कमांडोज’ या पदाकरीता ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, थेट पद्धतीने होणा-या या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नाही.

दि. २३ जुलै रोजी होणा-या भरतीमध्ये पुणे, ठाणे, सोलापूर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, कोल्हापूर, नागपूर, नंदुरबार, उस्मानाबाद, यवतमाळ अशा एकूण १४ जिल्ह्यातील युवकांना सहभागी होता येणार आहे. तसेच, दि. २६ जुलै रोजी होणा-या कॅम्पमध्ये अहमदनगर, बीड, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, वाशिम, वर्धा अशा एकूण १३ जिल्ह्यातील युवकांना सहभागी होता येणार आहे. याबाबत www.airmenselection.cdac.in आणि indianairforce.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील जास्तीत-जास्त युवकांनी या भरती प्रक्रियेत सहभागी व्‍हावे, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

महेश लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशनचे कुंदन लांडगे यांनी सांगितले की, भारतीय वायुसेना प्रशासन सिव्‍हीलमध्ये सहभागी होवून ज्यावेळी भरती प्रक्रिया राबवते. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घेतली जाते. त्यासाठी ‘इंन्फ्रास्ट्रक्चर’ची उपलब्धता करुन द्यावी लागते. पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील युवकांना सैन्यात भरती होण्याची संधी उपलब्ध व्‍हावी म्हणून आम्ही व  6 एअरमन सिलेक्शन सेंटर, मुंबई भारतीय वायु सेना यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घेतली. विशेष म्हणजे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे इ क्षेत्रीय कार्यालय अधिकारी श्रीनिवास दांगट आणि क क्षेत्रीय कार्यालय अधिकारी श्री. आण्णासाहेब बोदडे तसेच, भोसरी विधानसभा माजी सैनिक संघाचे अध्यक्ष नवनाथ मुऱ्हे आणि परिसरातील निवृत्त सैनिक यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे.

भारतीय वायुसेना निवृत्त लायजयन ऑफिसर शौकत शेख म्हणाले की, भोसरीत वायुसेना भरती कॅम्प व्‍हावा, अशी आमची अपेक्षा होती. याबाबत आम्ही भारतीय वायुसेना प्रशासनाकडे मागणी केली. यावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी घेतली. त्यासाठी लागणारा तंबू, मैदान, मंडप, सुरक्षा साधणे, टेबल-खूर्च्या यांसह सर्व ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ उभारणीची तयारी महेश लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशनने दर्शवली आहे. या भरती कॅम्पसाठी वायुसेनेचे एअर कमोडोर, विंग कमांडर दर्जाचे पाच अधिकारी व ८० जणांचा स्टाफ उपस्थित राहणार आहेत.
पहिल्या दिवशी शारीरिक क्षमता चाचणी-एक होईल. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी- दोन होईल. त्यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
**
भरती प्रक्रियेची पात्रता व अटी :
– जन्म तारीख : १९ जुलै १९९९ ते १ जुलै २००३ या दरम्यानचा जन्म असावा.
– शैक्षणिक : १२ वी उत्तीर्ण, इंग्रजीमध्ये किमान ५० टक्के गुण,

– कोणत्याही शाखेतून किमान ५० टक्के सरासरी गुण
– उंची : १५२.५ सेमी (कमीत कमी)
**
आवश्यक कागदपत्रे :
– मूळ १० वी प्रमाणपत्र आणि ४ प्रती.
– मूळ १२ वी गुणपत्रिका आणि ४ प्रती.
– मूळ १२ वी प्रमाणपत्र आणि ४ प्रती.
– १० फोटो (पासपोर्ट आकारातील).

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button