breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बेकायदेशीर पिस्टल दाखवून तरुणाची परिसरात दहशत

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगल्याचे दिसून आल्याने चाकण पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 12) दुपारी अडीचच्या सुमारास खेड तालुक्यातील श्रीपती बाबा पादुका समाधी याठिकाणी करण्यात आली.

अतुल तानाजी भोसले (वय 24, रा. म्हाळुंगे इंगळे, ता. खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रविण दौलत पाटील यांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल भोसलेजवळ बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्टल असून दोन जिवंत काडतुसे आहेत. तो खुलेआम दहशत माजवत फिरत असल्याची कुणकुण पोलिसांना लागली. त्यानुसार पोलिसांनी वरील ठिकाणी जाऊन अतुलला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल, दोन जिवंत काडतुसे एकूण 26 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button