breaking-newsराष्ट्रिय
बुखारी यांच्या हल्लेखोरांची छायाचित्रे प्रकाशित
श्रीनगर – जम्मू काश्मीर पोलिसांनी काल पत्रकार शुजात बुखारी यांच्या मारेकऱ्यांची छायाचित्र प्रकाशित केली असून त्यांना शोधण्यासाठी जनतेने सहाय्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. मोटार सायकलवरून आलेल्या तीन मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत त्यांची छायाचित्रे कैद झाली आहेत. तथापी त्यांचे चेहरे झाकलेले आहेत त्यामुळे त्यांची ओळख पटण्यात अडचणी येत आहेत. या हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जातील आणि त्यांना योग्य ते बक्षिसेही दिली जातील असे पोलिसांनी म्हटले आहे. आपल्या वृत्तपत्राच्या कार्यालयाच्या बाहेरच बुखारी आणि त्यांच्या दोन अंगरक्षकांची हल्लेखोरांनी काल गोळ्या घालून हत्या केली आहे.