breaking-newsराष्ट्रिय

बिहारमध्ये मोठा भाऊ बनण्यासाठी भाजपचीही धडपड

नवी दिल्ली – बिहारमध्ये मोठा भाऊ बनण्यासाठी जेडीयू आणि भाजप या मित्रपक्षांची लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी बाकी असतानाच रस्सीखेच सुरू झाली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार हे एनडीचा बिहारमधील चेहरा असतील, अशी ठाम भूमिका त्यांच्या जेडीयू पक्षाने घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीत बिहारमधील अधिक जागा वाट्याला येण्याच्या उद्देशाने दबावतंत्राचा भाग म्हणून जेडीयूच्या भूमिकेकडे पाहिले जात आहे. दुसरीकडे नितीश यांना बिहारमधील एनडीएचा चेहरा मानण्यास भाजप तयार असला तरी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढली जाईल, याची आठवण त्या पक्षाने करून दिली आहे. त्यातून जागावाटपात मोठा वाटा मिळावा ही भाजपची इच्छा प्रकट झाल्याचेच संकेत मिळत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button