breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बिल्डरांची माहिती देत नसल्याने लोकप्रतिनिधींकडून महिला कर्मचारी टार्गेट

– कर्मचारी महिलेच्या बदलीसाठी सत्ताधारी-विरोधकांनी लावला जोर
– ई प्रभागात एका महिलेविरुध्द पुढारी मंडळी एकवटले
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ई प्रभाग कार्यालयात सध्या एक महिला कर्मचारी विरुध्द लोकप्रतिनिधी असे चित्र निर्माण झाले आहे. या कर्मचारी महिलेची राजकीय दबावामुळे अधिकार नसताना एका अधिका-याने बदली केली. त्याची तक्रार संबधित कर्मचारी महिलेने महापालिका आयुक्तांकडे केली. त्यावर आयुक्त व प्रशासनाकडून कार्यवाही होण्याआधी च-होलीतील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या कर्मचारी महिलेला टार्गेट करण्याचा उद्योग सुरू केला. हे सगळे प्रकरण आपल्या परिसरातील बिल्डरांच्या फाईलींची माहिती महिला कर्मचारी देत नसल्यावरून सुरू झाल्याची चर्चा आता रंगली आहे. त्यामुळे ऐरवी महापालिकेच्या महिला कर्मचा-यांवरील अन्यायावरून अधिका-यांवर तोंडसूख घेणारे नगरसेवक, पदाधिका-यांचाच एका कर्मचारी महिलेला जाच सुरू असल्याचे दिसते आहे.
च-होली, मोशी परिसर सध्या  कात टाकत असून या परिसरात मोठ मोठ्या इमारती उभ्या राहत आहे. मोठ मोठे बांधकाम व्यायसायिकांचे गृहप्रकल्प या भागात आहेत. या गृहप्रकल्पासाठी बांधकाम परवाना, पाणीपुरवठा, रस्ते, वीज असा कारणासाठी महापालिकेकडे यावे लागते. वेगवेगळ्या प्रकाराचे ना-हरकत दाखले त्यांना घ्यावे लागतात. या सगळ्यात या परिसरातील पुढा-यांचा हस्तक्षेप वाढला असून कोणाचे काम करून द्यायचे आणि कोणाचे अडवायचे ? याचे नियोजन  राजकीय मंडळी करत असून त्यासाठी महापालिका प्रशासनावर दबाव टाकत आहेत. ही बाब सध्या ई प्रभागात सुरू असलेल्या एका वादामुळे चर्चेला आली आहे.
या प्रभागात काम करणा-या तृतीय क्षेणीतील एका कर्मचारी महिलेकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिका-यांकडून बिल्डरांची माहिती पुरविण्यासाठी तगादा लावला गेला. परंतु, कर्मचारी महिलेने त्यांना दाद न देता माहिती न देण्याची भूमिका घेतली. त्यावरून महानगरपालिकेतील एका वरिष्ठ पदाधिका-याने कर्मचारी महिलेची विभागप्रमुखाकरवी बदली केली. त्या जागी आपल्या एका जवळच्या आर्थिक हितसंबध असलेल्या कर्मचा-याला आणून बसविण्याचा प्रयत्न असल्याचे देखील पुढे येवू लागले आहे. परंतु, बदली  नियमानुसार झाली नसल्याने कर्मचारी महिलेने त्याच ठिकाणी काम सुरू ठेवले. नंतर या प्रकरणी नियम व प्रशासनाच्या परिपत्रकाचा पुरावा देत महिलेने महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. आयुक्तांकडे तक्रार गेल्यानंतर कारवाई होणे अपेक्षित असताना उलट या परिसरातील लोकप्रतिनिधींनी कर्मचारी महिलेला टार्गेट करणे सुरू केले. या सगळ्यात कर्मचारी महिलेला तेथून घालविण्यासाठी सत्ताधा-यांनी विरोधकांची छुपी मदत घेतल्याची चर्चा ई प्रभागात सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी पालिकेच्या कर्मचारी महिलेवर कथित अत्याचार प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधकांनी महापालिका अधिका-यांवर भलतेच तोंडसूख घेतले होते. त्यात महिला नगरसेविकांनी महिलांची बाजू उचलून धरली होती. परंतु, ई प्रभागातील या वादात फक्त आर्थिक लाभासाठी राजकीय मंडळींकडून एका कर्मचारी महिलेला जाच सुरू असल्याची  चर्चा जोर धरू लागली आहे. ही महिला कर्मचारी तनावाखाली असून राजकीय दबावामुळे महानगरपालिका प्रशासन महिला कर्मचा-याच्या बाजुने उभा राहताना दिसत नाही. प्रशासनाने योग्य भूमिका न घेतल्यास पुराव्यांसह या कर्मचारी महिलेने आता पीएमओ पोर्टलवर तक्रार करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या सगळ्याची ऊलट-सूलट चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button