breaking-newsपुणेमहाराष्ट्र

बिबवेवाडीत सापडला महिलेचा मृतदेह

पुणे – बिबवेवाडी परिसरात एका महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह शनिवारी सायंकाळी पोलिसांना आढळला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. या महिलेची ओळख पटली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. बिबवेवाडी पोलिसांना स्थानिक नागरिकांनी बिबवेनगर परिसरात एका मृतदेह सापडला असल्याची खबर दिली होती. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह बघितला असता तो एका मध्यमवर्गीय महिलेचा असल्याचा दिसला. मृतदेह सडलेल्या अवस्थेतील होता. यामुळे हा खूनाचा प्रकार आहे का, नैसर्गिक मृत्यू हे शवविच्छेदनानंतर कळेल असे पोलिसांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button