breaking-newsमनोरंजन

“बिग बॉस 12’मध्ये आणखी एक पोर्न स्टार येण्याची शक्‍यता

छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त आणि चर्चा झालेला हिंदी “बिग बॉस’चा पुढचा सीझन लवकरच सुरू होण्याची शक्‍यता आहे. यासाठी एप्रिल महिन्यातच ऑडिशन झाल्या होत्या. लेटेस्ट अपडेटनुसार पोर्न स्टार शांती डायनामाईटही या रिऍलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. जर असे झाले तर या शोमध्ये सनी लिओननंतर सहभागी होणारी ती दुसरी पोर्नस्टार ठरणार आहे. शांति डायनामाईट ही भारतीय वंशाची ब्रिटीश पोर्नस्टार आहे. तिचे खरे नाव सोफिया वासिलिएडु आहे. तिचा जन्म मात्र युगांडामध्ये झाला आहे आणि आशियातील टॉप 50 सर्वात सेक्‍सी महिलांमध्ये तिचा समावेश होतो. ही यादी ब्रिटीश नियतकालिक ईस्टर्न आयने प्रसिद्ध केली आहे.

यावेळच्या सीझनमध्ये स्पर्धकांना त्यांच्याबरोबरच्या कोणाही एका आवडत्या व्यक्‍तीबरोबर “बिगबॉस’च्या घरात प्रवेश करता येणार आहे. एकावेळी दोघांना घरात एन्ट्री दिल्यामुळे आता स्पर्धा दुपटीने वाढणार आहे. या ट्रबल ट्रबलमध्ये अनेकांना वरचढ होताना अनेक कुरापती कराव्या लागणार आहेत. यामुळे हा शो पहिल्यापेक्षा अधिकच रंजक आणि प्रेक्षणीय होणार आहे. त्यात जर शांती सारखी पोर्नस्टारही त्यात सहभागी असेल, तर आणखीनच मजा येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button