breaking-newsमनोरंजन

बिग बॉसच्या घरात रेशमला रडू कोसळले

बिग बॉसचा मागील आठवडा अनेक कारणांमुळं चर्चेत राहिला. डिक्टॅटरशिप टास्कमध्ये रेशमने मेघाला अंतर्वस्त्र धुण्यासाठी दिल्याचा आरोप सईने केला. या आरोपांमुळे रेशम दुखावली गेली. सईने हे आरोप ‘विकेंडचा डाव’मध्ये महेश माजरेकरांसमोरच केले होते. पण सईने असे न करता प्रथम माझ्याशी बोलायचे होते, असे रेशमने सांगितले. सईने चुकीचे केले असे म्हणत रेशमने आरोप फेटाळून लावले. मात्र, दुखावलेल्या रेशमला या आरोपांमुळे रडू कोसळले.

सईनं जे काही केलं, जे काही बोलली ते अयोग्य असून, तिनं रेशमची माफी मागावी, असं मत शर्मिष्ठा, आऊ आणि मेघानं व्यक्त केलं. त्यानंतर महेश मांजरेकर यांनी ‘माझ्या बाचा टिव्ही’द्वारे बिग बॉसच्या घरातील सर्वांशी संवाद साधला. त्यानंतर ‘कानगोष्टी’चा खेळ रंगला. आपल्या प्रतिस्पर्ध्यांविषयी काय वाटतं हे त्या कानात बोलायचं होतं. या खेळाला स्मितानं सुरुवात केली. तिनं सईविरोधात तक्रार केली आणि ती खूप गर्विष्ठ आहे असं स्मिता म्हणाली. त्यानंतर सईनंही त्या कानात सर्व स्पर्धकांविरुद्ध मत व्यक्त केलं. ती आस्ताद, स्मिता, रेशम आणि नंदकिशोरवर संतापली. त्यानंतर आऊ ही माझी बिग बॉसच्या घरातील आई आहे, असंही ती म्हणाली.

त्यानंतर रेशमनं कानगोष्टी केल्या. सई आणि मेघाविरोधात बोलताना तिला रडू कोसळलं. तिनं दोघींविरोधात नाराजी व्यक्त केली. मी केवळ टास्कदरम्यानच त्यांच्याशी बोलणार आहे, असं तिनं जाहीर करून टाकलं. त्यानंतर ती मेघावर बरसली. मेघानं झालेल्या प्रकारासंदर्भात सईशी न बोलता थेट माझ्याशी बोलायला हवं होतं, असं ती म्हणाली. त्यावर सईला मांजरेकरांसमोर बोलण्यास मी सांगितलं नाही, असं स्पष्टीकरण मेघानं दिलं. त्यानंतर ती सईवर संतापली. रेशमवर केलेल्या आरोपानंतर सई तिची माफी मागणार आहे. आता रेशम सईला माफ करणार का, हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, या आठवड्यात कुणालाही घराबाहेर जावं लागणार नाही. सगळेच सुरक्षित आहेत, असं मांजरेकरांनी घोषित केलं. त्यामुळं घरातील सर्वच स्पर्धकांना आनंद झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button