breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बारामतीसारखा मावळचा विकास करणार; उमेदवार पार्थ पवार यांचा विश्वास

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – हे भाजप सरकार केवळ डिजिटल सरकार आहे. या सरकारने तरुणांना डिजीटल स्वप्ने दाखविली. परंतु, आज देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. मी नवीन असलो तरी माझ्यावर विश्वास दाखवा. मावळ लोकसभा मतदार संघ पिंपरी-चिंचवड आणि बारामतीसारखा करून दाखवेन, असा विश्वास मावळ लोकसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी नागरिकांना दिला.

मावळ मतदार संघातून ते निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या प्रचाराचा नारळ त्यांचे आजोबा शरद पवार यांच्या हस्ते फोडण्यात आला. यावेळी सभेला संबोधीत करताना पार्थ पवार बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे जयंतराव पाटील, नेते दिलीप वळसे पाटील आदी नते स्थानिक पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

पार्थ पवार म्हणाले की, हे माझं पाहिलं भाषण आहे. आज पक्षाने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे. ती पूर्ण विश्वासाने पार पाडणार आहे. ज्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड आणि बारामतीचा कायापालट झाला. तसा विकास मावळात केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आज संपूर्ण महाराष्ट्राने पवार कुटुंबियावर भरभरून प्रेम केलं आहे. तसंच, प्रेम द्या. मी नवीन असलो तरी दादासाहेब आपण काळजी करू नये. माझ्यावर विश्वास ठेवावा. तुम्ही दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणाने पार पाडेन, असा विश्वास त्यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button