breaking-newsमनोरंजन

बाबा रामदेव यांच्याकडून सुनिल शेट्टी घेतो योगाचे धडे

बॉलिवूडच्या अनेक तारकांनी योगाभ्यास शिकण्यासाठी बाबा रामदेव यांच्याकडे क्‍लास लावला आहे. आता त्यामध्ये ऍक्‍शन मॅन सुनिल शेट्टीचीही भर पडली आहे. बाबा रामदेव यांच्याकडून योगाभ्यास शिकण्यासाठी सुनिल शेट्टीने नुकतेच हरिद्वारची ट्रीप केली होती. बाबा रामदेव यांनी सोशल मिडीयावर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांच्या शेजारी सुनिल शेट्टीही ध्यानमुद्रेमध्ये बसलेला दिसत आहे.

हा फोटो बघून काही जणांनी त्याला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. त्याने केलेली ध्यानमुद्रा विचित्र आहे असे काही जण म्हणाले. तर काहींनी त्याला “शेट्टी बाबा’ संबोधायला सुरूवात केली आहे. डिसेंबर 2016 मध्ये रामदेव बाबांनी रणवीर सिंहलाही योगाभ्यासाचे धडे दिले होते. एका कार्यक्रमात रणवीरने बाबा रामदेव यांना डान्स करण्याची विनंती केली होती. पण बाबांनी त्याबदल्यात रणवीरला योग करण्याची अट घातली होती. ही अट रणवीरने मान्य केली होती.

रामदेव बाबांनी केलेली योगासने बघून रणवीर थक्क झाला आणि त्याने सपशेल शरणागती पत्करली होती. त्यानंतर रामदेव बाबांनी रणवीरला सूर्यनमस्कारही करायला लावले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button